City-News.in

News that You can Use

हिमेश रेशमिया, उदित नारायण आणि जावेद अलीचे नवे राष्ट्रगान!

सिटी-न्यूज.इन : कोविड१९ च्या स्थितीत देशाचे मनोबल उंचावून,  त्याला एक करण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी संगीतासारखी दुसरी शक्ती नाही.  तब्बल २५ वर्षांपूर्वी सर्वप्रथम सुरू झालेल्या सारेगमपा या देशातील सर्वाधिक काळ सुरू

 असलेल्या संगीतविषयक   कार्यक्रमाने सामान्य माणसाचे मनोबल उंचावण्यासाठी  प्रयत्न केले.  त्यामुळे २०२० मध्ये  सारेगमपा हा कार्यक्रम आपली पंचविशी साजरी करीत आहे,  तेव्हा या      संगीताच्या जादूचा उपयोग सध्याच्या कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी झी नेटवर्क करणार आहे

येत्या २३ मे रोजी सुरू होणारा संगीताच्या क्षेत्रातील अशा तर्‍्हेचा हा 

पहिलाच संगीत जलसा असेल जो फेसबुकवरील झीच्या सर्व 

११ पेजवरून प्रसरित केला जाईल. सलग २५ तास सुरू राहील आणि 

ज्यात भारतीय परंपरेचा सूर, ताल आणि आत्मा प्रतिबिंबीत होईल.  २४ मे रोजी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर हा २५ तासांचा संगीत जलसा  एक देश एक रंग या कार्यक्रमात रुपांतरित होणार असून १० भारतीय  भाषांतील या जलशाचे झी नेटवर्कच्या सर्व १९ वाहिन्यांवरून प्रसारण केले जाईल.  त्यात झीवरील अनेक नामवंत गायक सहभागी होतील.

‘एक देश, एक रंग’मध्ये गाणे गाणारा हिमेश रेशमिया म्हणाला,  भारतात सारेगमपा हा सर्वात लोकप्रिय आणि आवडता संगीतविषयक  कार्यक्रम असून आपल्या प्रसारणाची २५ वर्षं पूर्ण करणारा हा पहिला  रिअ‍ॅलिटी कार्यक्रम ठरला आहे. किंबहुना मी स्वत:च या कार्यक्रमाशी  आता १५ वर्षं निगडित आहे त्यामुळे ह कार्यक्रम माझ्या दृष्टीने खासच  आहे. एक देश, एक रंग  कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली,  हा मी माझा गौरव समजतो.  या कार्यक्रमाच्या टीमने एक अनोखी संकल्पना हम होंगे कामयाब ही तयार केली असून त्याद्वारे देशात कोविद साथीशी  लढणार्‍्यांसाठी आदरांजली वाहण्यात येणार आहे.

जावेद अली म्हणाला, “सध्या जग एका भयानक आव्हानावर मात  करण्यासाठी धडपडत आहे. या साथीचा संसर्ग होण्याचा धोका पत्करून  तिला नष्ट करण्यासाठी धडपडणार्‍्या शूर वैद्यकीय कर्मचार्‍्यांच्या  सन्मानासाठी मी एक नवे राष्ट्रगीत हिमेश रेशमियाजी आणि उदितजी  यांच्यासारख्या महान गायकांबरोबर गाणार आहे. या भावपूर्ण आणि  प्रेरणादायक गाण्याच्या सुरात सूर मिसळून  सारा देश हे गाणं गाईल, याबद्दल मला खात्री आहे.”

२३ मेपासून झीच्या सर्व डिजिटल व्यासपिठांवर एकमेवाद्वितीय  अशा लाइव्ह ए थॉनमध्ये सहभागी होऊन २४ मे रोजी एक देश,  एक रंग या सांगितिक जलशात सहभागी होण्यासाठी सिध्द व्हा!  झी नेटवर्कच्या झी टीव्ही, झी केरळम, झी पंजाबी, झी मराठी,  झी युवा, झी बंगला, झी सार्थक, गंगा, झी तामीळ, झी तेलुगू  आणि झी कन्नडा यासह सर्व १९ वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाईल.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
%d bloggers like this: