City-News.in

News that You can Use

सिटी-न्यूज.इन : आपल्या कष्ट व मेहनतीच्या जोरावर नाव कमावलेल्या सुशांतसिंह राजपूतने रविवारी १४ जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशात काहींनी सोशल मीडियावर बॉलिवूडकरांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर काहींनी त्याला श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी सुशांतच्या मृत्यूशी निगडीत एका पोस्टमध्ये लिहिलं की, सुशांत त्यांच्याकडे जाऊन रडला होता.

शेखर कपूर यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘तुला किती वेदना झाल्या असतील याची मला जाणीव आहे. मला त्या लोकांचीही गोष्ट माहीत आहे ज्यांनी तुला पूर्णपणे निराश केलं. यानंतर तू माझ्या खांद्यावर डोकं टेकून रडला होतास. गेले सहा महिने मी जर तुझ्यासोबत असतो तर.. जर तू माझ्याशी बोलला असतास तर.. तुझ्यासोबत जे झालं ते तुझं नाही तर त्यांचं कर्म आहे.’

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
%d bloggers like this: