City-News.in

News that You can Use

प्रतिनिधी : मुख्यमंत्री म्हणून उध्द्वव ठाकरे यांचं नेतृत्व कमी पडतंय असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत मी केवळ मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता. मात्र प्रसारमाध्यमांनी माझं म्हणणं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मांडलं,’ असा खुलासा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी केला आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या एका वार्तालापात चव्हाण बोलत होते.  करोनानंतरच्या राज्यातील परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले होते. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली पाहिजे. तसंच, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांचा सल्ला घेतला पाहिजे,’ असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं होतं. मात्र, त्यानंतर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली. ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलाय. नेतृत्व कमी पडतंय असं मी कुठंही म्हटलेलं नाही. प्रशासकीय व्यवस्थेवर मी जरूर बोललो होतो. अनेक अधिकाऱ्यांकडं कुठलीही जबाबदारी नाही तर काही अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी आहे. असं न करता प्रत्येकाला जबाबदारी द्यावी, असा सल्ला मी मुख्यमंत्र्यांना दिला होता. हे ताबडतोब व्हायला हवं, असंही मी म्हटलं होतं. हे सगळं रेकॉर्डवर आहे. ते कुणीही ऐकावं आणि निष्कर्ष काढावा’, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
%d bloggers like this: